फोटो सौजन्य - Social Media
अनुभवी आणि तद्न्य व्यक्तींसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून फक्त २ पदे भरण्यात येणार आहेत. फक्त २ पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या संबंधित अधिकृत जाहिरात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत वेब साईटवर जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च निश्चित करण्यात आली आहे. अंतिम मुदत संपत आली आहे अशात रिक्त पदेही फार कमी आहेत, त्यामुळे या भरतीमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. अशात इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज नोंदवावा. पण त्याआधी जाहीर करण्यात आलेले काही निकष लक्षात घ्यावेत.
विधी अधिकारी या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. इतकेच नव्हे तर उमेदवाराला गुन्हेगारी, सेवा, कायदे व प्रशासकीय क्षेत्राचे सखोल ज्ञान व अभ्यास असणे अनिवार्य आहे. एकंदरीत, या भरतीमध्ये संबंधित क्षेत्रात अनुभवी व्यक्तीलाच अर्ज करता येणार आहे.
या संदर्भातील अधिकृत वेतन स्पष्ट करण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार, विधी अधिकारी पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवाराला वीस हजार मासिक वेतन देण्यात येईल तसेच तीन हजार अतिरिक्त खर्च देण्यात येईल. विधी अधिकारी वर्ग – ब पदासाठी नियुक्त उमेदवाराला पंचवीस हजार रक्कम वेतन देण्यात येईल तसेच तीन हजार अतिरिक्त खर्च देण्यात येईल.
महत्वाची बाब म्हणजे नियुक्त उमेदवाराने समाधानकारक कामगिरी केल्यास करार जास्तीत जास्त तीन वेळा वाढवण्यात येईल. उमेदवारांना ५० गुणांची लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. तर २५ गुणांच्या मुलाखतीलाही सामोरे जावे लागणार आहे. किमान ६०% गुणांनी पात्र होणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवाराला वकील व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार हिंदी, मराठी तसेच इंग्रजी तिन्ही भाषेत कसब असावा. अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिकृत अधिसुचनेचा आढावा घेण्यात यावा.