फोटो सौजन्य - Social Media
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने जनरल ड्युटी (GD) कॉन्स्टेबल भरतीला सुरुवात केली होती. या संदर्भात परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना नियुक्ती मिळवण्यासाठी या परीक्षांना पास करणे अनिवार्य आहे. यामध्ये फिझिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) तसेच फिझिकल एफिशियंसी टेस्ट (PET)चा समावेश आहे. महतवाची बातमी अशी आहे कि या परीक्षांसंदर्भातील एडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांना उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना हे प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. ज्या उमेदवारांनी SSC GD परीक्षा २०२४ ला उत्तीर्ण केले आहे. त्या उमेदवारांना या प्रवेश पत्राला डाउनलोड करता येणार आहे.\
हे देखील वाचा : महाराष्ट्र TET परीक्षेसाठी नोंदणी सुरू, कधी होणार परीक्षा? अर्ज कधीपासून उपलब्ध? जाणून घ्या एका क्लिकवर
अशा प्रकारे करता येईल प्रवेश पत्र डाउनलोड
परीक्षेच्या ठिकाणी उमेदवारांकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे. प्रवेश पत्राशिवाय उमेदवार चाचणी परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे या बाबतील उमेदवारांनी काळजीपूर्वक राहावे. परीक्षा स्थळी जाताना आपल्या सोबत प्रवेश पत्र आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी. एकंदरीत, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून GD कॉन्स्टेबलची भरती केली जाणार होती.
हे देखील वाचा : सरकारला रिटायर व्यक्तींची गरज; वयस्करांसाठी आणली बंपर भरती
संगणकावर आधिरीत असलेल्या परीक्षेच्या माध्यमातून शॉर्टलिस्ट केले गेलेल्या उमेदवारांना सीएपीएफ, एसएसएफ, आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (जीडी) आणि NCB मध्ये सैनिक सीटी (जीडी) परीक्षा-2024 चा डीवी/डीएमई आणि आरएमई नंतर पीएसटी/पीईटी कार्यक्रम 23 सप्टेंबर 2024 ला आयोजित केले गेले आहे. सगळ्या उमेदवारांना हे निर्देश दिले जात आहे कि PST तसेच PET आणि त्यानंतर असलेल्या DV /DME च्या वेळी प्रवेश पत्राची परत सोबत आणावी. प्रवेश पत्राशिवाय उमेदवारांना पीएसटी/पीईटी तसेच डीवी/डीएमई/आरएमई परीक्षेसाठी परवानगी दिली जाणार नाही.