फोटो सौजन्य - Social Media
अनु बेनिवाल या दिल्लीतील पीतमपुरा येथे जन्मलेल्या असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्मून तिने मोठ्या संघर्षाने आयुष्यात फार मोठे ध्येय काबीज केले आहे आणि आई वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव उंच शिखरावर नेले आहे. त्यांनी दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून फिजिक्स ऑनर्ससह B.Sc. आणि M.Sc. पूर्ण केली आहे तसेच नॅनोसायन्सवर संशोधन केले आहे. विज्ञान क्षेत्रात रस ठेवणाऱ्या अनु यांच्यात देशासाठी आधीपासून फार प्रेम होते. तसेच देशासाठी काही तरी करून दाखवण्याचे धाडस होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होणे आवश्यक होते.
UPSC परीक्षेत त्यांनी चार प्रयत्न केले. पण त्यांनी कधी हार मानली नाही. पहिल्या दोन वेळा अपयश आले. पण त्या जिद्दीने उभे राहिल्या. त्यांना त्यांचे ध्येय ज्ञात होते आणि काहीही करून त्यांना अधिकारी बनायचे होते. तिसऱ्या प्रयत्नात AIR 636 आणि चौथ्या प्रयत्नात AIR 217 मिळवून IPS बनल्या. 2022 बॅचच्या अनु सध्या मध्य प्रदेश कॅडरमधील धार जिल्ह्यात मनावर येथे SDOP पदावर कार्यरत आहेत. याआधी त्या ग्वालियरच्या बीजौली पोलीस ठाण्याच्या SHO होत्या आणि रेत माफियाविरुद्ध कारवाईसाठी त्यांचे कौतुक झाले.
अनु सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत, इंस्टाग्रामवर त्यांचे 1.4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांची चाहतेमंडळी अफाट आहेत. तसेच देशातील एक यशस्वी आणि लोकप्रिय IPS अधिकारी म्हणून तरुणाई त्यांच्याकडे पाहते. त्यांनी 2023 मध्ये IPS डॉ. आयुष जाखड यांच्याशी लग्न केले, जे देखील 2022 बॅचचे अधिकारी असून एमपी कॅडरमध्ये SDOP आहेत.
15 ऑगस्ट 2025 रोजी अनु बेनिवाल यांना मनावर येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, UPSC क्लिअर करण्यासाठी स्वतःचे नोट्स तयार करणे, उत्तरलेखनाची सराव ठेवणे आणि योग्य अभ्याससामग्री वापरणे आवश्यक आहे. अनु बेनिवाल ‘ब्यूटी विथ ब्रेन’ म्हणून ओळखल्या जातात आणि आज त्या लाखो युवांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.