युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) मार्फत नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) ने ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये CBT (कॉम्प्युटर आधारित चाचणी) पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. NTA ने 14 जानेवारी 2026 रोजी UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तर पत्रिका जाहीर केली होती. उमेदवारांना १४ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान उत्तर पत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी ऑब्जेक्शन विंडो खुली ठेवण्यात आली होती.
आता निकाल जाहीर होताना NTA कडून सर्व 83 विषयांसाठी स्वतंत्र कट-ऑफ यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. यासह फायनल उत्तर पत्रिका पोर्टलवर अपलोड केली जाईल. उमेदवारांनी आपल्या स्कोअरकार्डमधील नाव, रोल नंबर, विषयाचे नाव आणि मिळालेले गुण यांची काळजीपूर्वक तपासणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
उम्मेदवारांना सल्ला
उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची तपासणी विषयतज्ज्ञांच्या पॅनेलकडून केली जाईल. तज्ज्ञांच्या मतानुसारच अंतिम उत्तर पत्रिका तयार करण्यात येणार आणि त्याआधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. त्यामुळे उमेदवारांना नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Ch. Sambhajinagar : शिक्षकांचे ‘डेटा’ संकलन सुरू; शिक्षक पात्रता परीक्षेत केंद्र व एनसीटीईशी साधला संपर्क
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही अट मागील तारखेपासून लागू करायची की नाही, याबाबत राज्यात अद्याप स्पष्टता नसतानाच शालेय शिक्षण विभागाने आता सेवेत असलेल्या शिक्षकांचा सविस्तर डेटा संकलन सुरू केले आहे. या निर्णयाचा प्रत्यक्ष परिणाम किती शिक्षकांवर होणार, याचा अंदाज घेण्यासाठी ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे वय, नेमणुकीचे वर्ष, नेमणुकीच्या वेळी टीईटी उत्तीर्ण होते की नाही, तसेच टीईटीमधून सूट मिळालेल्या शिक्षकांची माहिती स्वतंत्रपणे गोळा केली जात आहे.
Ans: ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर.
Ans: अर्ज क्रमांक (Application Number) आणि जन्मतारीख.
Ans: फायनल उत्तरतालिका आणि 83 विषयांचे कट-ऑफ गुण.






