फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UGC NET Admit Card 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाणारी यूजीसी नेट (UGC-NET) परीक्षा भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ (सहाय्यक प्राध्यापक) पदाच्या पात्रतेसाठी आणि ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ (JRF) साठी घेतली जाते. यावर्षी यूजीसी नेट जून २०२६ परीक्षेचे आयोजन २२ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएने अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट (Admit Card) जारी केले आहे.
उमेदवार यूजीसी नेट जून २०२६ परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वरून डाऊनलोड करू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
१. सर्वात आधी उमेदवाराने यूजीसीनेटच्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जावे.
२. होमपेजवर दिलेल्या ‘Candidate Activity’ या सेक्शनवर क्लिक करावे.
३. त्यानंतर ‘UGC-NET June 2026 Exam Admit Card’ या लिंकवर क्लिक करावे.
४. आता तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि दिलेला सिक्युरिटी पिन टाकून लॉगिन करावे.
५.आता तुमच्या स्क्रीनवर परीक्षेचे ॲडमिट कार्ड दिसेल.
६. तुमचे हॉल तिकीट तपासा, डाऊनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट आउट काढून घ्या.
ही परीक्षा २२ ते ३० जून दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित चाचणी (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत एकूण दोन पेपर असतील:
पेपर १ (सर्व सामान्य): हा पेपर १०० गुणांचा असेल, ज्यामध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील.
पेपर २ (विषय निहाय): हा पेपर उमेदवाराच्या मुख्य विषयावर आधारित असेल, जो २०० गुणांचा असून त्यात १०० प्रश्न विचारले जातील.
महत्त्वाच्या सूचना: परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार, वैध ॲडमिट कार्डशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी आपल्या हॉल तिकीटची मूळ प्रत आणि ओळखपत्र सोबत ठेवायला विसरू नका.
दिल्ली हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! खाजगी शाळांतील महिला शिक्षिकांनाही मिळणार आता Child Care Leave!






