रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा दरडीचे संकट ओढवले आहे. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्याने सुमारे १५० घरांना दरडीचा गंभीर धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. प्रशासनाने धोकादायक परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक कुटुंबे अद्यापही धोक्याच्या छायेतच राहण्यास मजबूर आहेत. दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगर आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित निवारा, स्थलांतराची व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.