भारतात कसा आहे श्रीलंकेचा रेकॉर्ड (फोटो- सोशल मिडिया)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरिज केवळ द्विपक्षीय लढत नसून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पॉईंट्स टेबलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. 7 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवस सराव सामना खेळवला जाणार आहे. तर पहिला सामना 15 ते 19 तर दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल भारताचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये 9 सामन्यानंतर 48.15 पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध चांगले प्रदर्शन केल्यास न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सिरिजआधी भारताची स्थिती अधिक मजबूत होऊ शकते.
श्रीलंकेत भारतीय संघाचा रेकॉर्ड आतापर्यंत अत्यंत चांगला राहिला आहे. 1985 ते 2017 पर्यन्त दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 कसोटी सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये भारताने 9 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यात पराभव झाला आहे. तर 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने श्रीलंकेत 1985 मध्ये कोलंबोमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.
2015 मध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते. तो सामना श्रीलंकेने 63 रन्सने जिंकला होता. त्यानंतर भारताने एकही सामना गमावला नाही. पाच पैकी पाच सामने भारताने जिंकले आहेत. 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेचा दौरा केला होता. तेव्हा टी सिरिज भारताने जिंकली होती. श्रीलंकेत भारताचा रेकॉर्ड गेल्या काही वर्षांपासून चांगला राहिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकणे आवश्यक असणार आहे.
IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…
भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहमंद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, स्रांश जैन.






