साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर युवकाकडून अत्याचार (File Photo : Crime)
अमरावती : अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 65 वर्षीय नराधमाने एका तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. अशातच दर्यापूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना एका गावात 18 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. यामध्ये 13 वर्षीय मुलाने 8 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे.
हेदेखील वाचा : Badlapur crime : ‘शेजारचा दादा आला आणि कडेवर घेऊन अंधाऱ्या ठिकाणी…,’ ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बदलापूर पुन्हा हादरलं
पीडित मुलीला शनिवारी (दि.18) रात्री अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ वर्षीय मुलीचे आई-वडिल हे कामावर गेले होते. अशातच विधीसंघर्ष बालकाने आपल्या लहान भावाच्या माध्यमातून आठ वर्षीय मुलीला घरी बोलाविले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीची आई घरी आल्यानंतर तिला हा धक्कादायक प्रकार माहिती पडला. त्यामुळे त्यांनी तत्काळ दर्यापूर पोलिसात तक्रार केली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीचे शोधकार्य सुरु केले होते.
दरम्यान, मुलीची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी विलंब होत असल्याने नातेवाईकांनी संतप्त होत निदर्शन केले. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्राम्हणे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रकरण शांत झाले.
विवाहित महिलेवर अत्याचार
एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्यामुळे ती गर्भवती राहिली आणि तिची प्रसूती झाली. या घटनेची तक्रार पीडित महिलेने शनिवारी (दि. 18) चांदूरबाजार पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी रोशन राजाराम बेठे (22, रा. जैतदिनी, ता. चिखलदरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तीचे लग्न झाले असून, तिचे पती मुंबई येथील कंपनीत काम करतात. महिलेचे माहेर हे पिली गावातील असून, तिची 2022 मध्ये रोशनसोबत ओळख झाली.
बदलापुरात पुन्हा लैंगिक अत्याचार
बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.