छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा’ असं लिहिलेलं होत. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
Accident : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकिताने तिच्या कुटुंबीयांना फोन करून एक महत्त्वाची माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, ‘तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका.’ असे असूनही, तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरून 25 कॉल आले होते.
दीड महिन्यापूर्वीच आली होती शहरात
निकिता हिचे फार्मसीचे शिक्षण पुणे येथे झाले होते. ती दीड महिन्यापूर्वीच शहरात नोकरीसाठी आली होती. आविष्कार कॉलनीतील एका खोलीत राहून ती वोक्हार्ट नावाच्या कंपनीत नोकरी करत होती. ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील वांजूळ पोही येथील होती.
कामावर गेली नाही म्हणून…
तिच्यासोबतच्या इतर दोन मैत्रिणी सुट्ट्यांमुळे गावी गेल्या होत्या, त्यामुळे ती खोलीत एकटीच होती. शनिवारी निकिता कामावर गेली नाही, म्हणून शेजारील खोलीतील मुली तिला मेसवर जाण्यासाठी बोलवायला आल्या. मात्र, निकिताने दरवाजा उघडला नाही. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस तपास सुरु
निकिताच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सिडको पोलीस करत आहेत. पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाइलमधून तिला कोण ब्लॅकमेल करत होते आणि तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.निकिताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
वाशीम हादरलं! मानसिक आजार आणि व्यसनाधीनतेतून पतीकडून पत्नीची हत्या
वाशीम जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीला दवाखान्यात नेण्याच्या मामुली वादातून पतीने पत्नीवर धारदार शास्त्राने वार करून तिची हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वाशीम जिल्ह्यंक्तही कोठारी गावात घडली आहे. या घटनेने वाशीम जिल्ह्या हादरून गेला आहे.