1 ग्रॅम रिसिन विष अन् मृतांचा खच ! कोण आहे हा डॉक्टर? देशाची हवा विषारी करण्याचा रचत होता कट
Ricin Terror Plot News in Marathi : दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. लष्करी दर्जाची स्फोटके वापरल्याचा संशय आहे, ज्यामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त केल्यानंतर घाईघाईत हा स्फोट झाला. स्फोटातील सूत्रधार डॉ. मोहम्मद उमरशी संबंधित अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. याचदरम्यान अलिकडेच, गुजरात एटीएसने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून एका डॉक्टरला अटक केली आणि त्याच्याकडे रिसिन नावाचे धोकादायक विष आढळले. ही घटना केवळ सुरक्षेचा प्रश्न नाही तर आरोग्यासाठी गंभीर इशारा देखील आहे.
रिसिन हे एरंडेलाच्या बियाण्यांपासून बनवलेले विष आहे आणि त्याचे १ ग्रॅम देखील 12 नागरिकांचा जीव घेऊ शकते. हे विष इतके प्राणघातक आहे की, श्वास घेतल्यानेही मृत्यू होऊ शकतो आणि सर्वात भयानक म्हणजे, त्यावर कोणताही उतारा किंवा उपाय नाही. रिसिन म्हणजे काय, ते शरीरावर कसे परिणाम करते, ते किती धोकादायक आहे आणि ते रोखणे शक्य आहे का ते जाणून घेऊ.
गुजरात एटीएसने रिसिन दहशतवादी कटाशी संबंधित पुरावे शोधण्यासाठी या डॉक्टरच्या घराची झडती घेतली. अहमद मोइयुद्दीन सय्यदच्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात अज्ञात रसायने आणि कच्चा माल देखील सापडला. एटीएसने या डॉक्टरच्या पार्श्वभूमीची चौकशी केली तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने जनरल फिजिशियन असलेले ३६ वर्षीय मोइयुद्दीन सय्यद यांनी चिनी विद्यापीठातून एमबीबीएस पदवी मिळवली. कधीही रुग्णालयात सहभागी झाले नाहीत किंवा क्लिनिकमध्ये काम केले नाही. त्यांनी रुग्णांना ऑनलाइन पाहिले आणि कोणतेही शुल्क आकारले नाही. पैसे कमविण्यासाठी, त्यांनी एक वेगळा व्यवसाय सुरू केला होता. ऑनलाइन अन्न व्यवसायात भागीदार होते.
या ‘डॉक्टर डेथ’च्या कटाबद्दल असेही उघड झाले आहे की, एरंडेल बीन्समधून धोकादायक रिसिन विष वेगळे करू शकले नाहीत. हे होण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. या डॉक्टरच्या योजनेत इतरही त्रुटी होत्या आणि त्या दुरुस्त करण्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आले. जैविक दहशतवादी हल्ल्यात ते हे विष कसे पोहोचवायचे हे देखील त्यांना ठरवता आले नव्हते.
गुजरात एटीएसला असेही कळले आहे की, डॉ. सय्यद त्यांच्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. ते एका फ्लॅटमध्ये एकटे राहत होते जिथे रसायने असलेली पॅकेजेस वारंवार आढळत होती. कुटुंबातील सदस्यांनी विचारले असता, त्याने फक्त एवढेच सांगितले की तो एक विशेष रसायन विकसित करत आहे, ज्यामुळे त्याला खूप पैसे मिळतील. तो अविवाहित होता आणि सहा भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याचे कुटुंब तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील आहे.
गुजरात ATS असाही दावा करते की डॉ. सय्यद एका दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहे. त्याचा हँडलर खादीजाचे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) शी संबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोन जणांना अटक केली आहे.






