लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
संगमनेर : संगमनेर शहरातील वाडेकर गल्लीत राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.3) दुपारी उघडकीस आली. दोन वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या अवघ्या 16 वर्षीय लहान मुलाने घरातच तर पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या केली. अवघ्या दोन महिन्यात वाडेकरांचे आख्खे कुटुंबच संपल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा : खाकीनेच खाकीचा केला घात! 8वी पास तोतया हवालदाराकडून 10 महिला कॉन्स्टेबलवर लैंगिक अत्याचार, ‘असा’ उघड झाला बनाव
गणेश मच्छिंद्र वाडेकर (वय ५५) व त्यांची पत्नी गौरी गणेश वाडेकर (दोघे रा. वाडेकर गल्ली, संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. वाडेकर संगमनेर नगरपालिकेत लिपिक पदावर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. गौरी वाडेकर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका होत्या. या दोघांनी राहत्या घरी छताला गळफास घेतला. याच दाम्पत्याचा पुण्यात शिक्षण घेणारा मोठा मुलगा श्रीराज गणेश वाडेकर (वय २१) याने पाच दिवसांपूर्वी आपल्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.
तर 26 ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांचा धाकटा मुलगा श्रेयस गणेश वाडेकर (वय 16) यानेही वाडेकर गल्लीतील घरात गळफास घेतला होता. आज त्यांच्या आई-वडिलांनीही गळफास घेत जीवनयात्रा संपविली. दोन्ही मुलांच्या आत्महत्येतून आलेले नैराश्य यामागे असावे, अशी शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. अवघ्या दोनच वर्षात संपूर्ण कुटुंबाने गळफास घेतल्याने कुटुंबच संपुष्टात आले आहे.
एका मुलाने पाच दिवसांपूर्वी घेतला गळफास
घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात गौरी वाडेकर पारिचारिका पदावर कार्यरत होत्या. कोविड काळात त्या कोविड सेंटरच्या प्रमुख होत्या. त्यांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. तसेच ग्रामीण रुग्णालयाचा संगणकीय विभागही त्या सक्षमपणे सांभाळत होत्या. गणेश गाडेकर यांनीही संगमनेर पालिकेत विविध विभागात आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. मात्र, आत्महत्या करून त्यांनी जीवन संपवंल आहे.
हे सुद्धा वाचा: CBI ने केली पोलखोल, RG Kar College चे माजी प्राचार्याचा मोठ्या रॅकेटमध्ये सहभाग, आंदोलकांनी केली फाशीची मागणी