सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : शांत शहरातील गजबजलेला फर्ग्युसन कॉलेज रोड, वर्दळीचा कॅम्पमधील एम. जी. रोड आणि विश्रांतवाडीतील उच्चभ्रू आर अँड डी ई परिसर मोठ्या थराराने गाजला. अंगावर शहारे आणणारा हा सर्व थरार नागरिकांनी डोळ्यात साठवला. पण, भितीने काही काळ हृदयाचा ठोका चुकवलेला हा प्रसंग एक मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी नि:श्वास सोडला. या ड्रिलमध्ये सुरक्षा दल, विमान हायजॅक व नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (एनएसजी), केंद्रीय दल आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग होता.
कोणत्याही क्षणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव ठेवून देशातील महत्वाच्या शहरात हा सराव आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार पुण्यातील फर्ग्युसन रोडवर गर्दीच्या मध्यभागी, तसेच एम. जी. रोड येथे बॉम्बस्फोटाचा प्रसंग दाखविण्यात आला. तर, विश्रांतवाडीतील आर अँड डी ई येथील शास्त्रज्ञांना बंदी बनवण्यात आले. सायंकाळी विमानतळावर एक विमान हायजॅक करून त्यातील प्रवाशांना ओलीस धरण्यात आले. या चारही ठिकाणी पोलिस व आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल झाल्या. घटनास्थळ बंदिस्त करून संशयितांना ताब्यात घेणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, जखमींना मदत पोहोचविणे अशी शृंखलाबद्ध कारवाई प्रत्यक्ष राबविण्यात आली.
दरम्यान, या घटनांची पूर्वकल्पना नसल्याने नागरिक गोंधळले; मात्र लगेच हा सुरक्षा सराव असल्याचे समजताच अनेकांनी कुतूहलाने मॉकड्रिल पाहण्यासाठी गर्दी केली. काही ठिकाणी वाहतूक थोडा वेळ विस्कळीत झाली होती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यासह विविध झोनमधील उपायुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले.
‘रिस्पॉन्स टाईम’ची नोंद
आपत्कालीन प्रसंग घडल्यास पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा किती वेळात घटनास्थळी पोहोचतात व मदतकार्य सुरू करतात, याचा अभ्यास करण्यात आला. स्थानिक पोलिसांसह विविध यंत्रणांना दाखल होण्यासाठी लागलेल्या रिस्पॉन्स टाईमची नोंद याध्यमातून घेण्यात आली. प्रत्येक टप्प्यातील वेळेची नोंद घेऊन यंत्रणांमधील समन्वयाची चाचणीही करण्यात आली.
500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं