chandrapur (फोटो सौजन्य - pinterest)
चंद्रपुर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन जिगरी मित्रांपैकी एकाच मृतदेह आढळला तर दुसरा त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापाला आहे. मात्र अद्याप हि हत्या कोणत्या कारणावरून झाली आणि कोणी केली हे समोर आले नाही आहे. प्रेम प्रकरणातून घटना घडल्याची चर्चा आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
खासगी वसतिगृहात बालकांवर अमानुष अत्याचार; कल्याणमध्ये लैंगिक शोषण आणि मारहाणीची गंभीर घटना
प्रेम प्रकरणातून घटना घडल्याची चर्चा,
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव प्रज्वल गोवर्धन नवले (२१) असे नाव आहे. तर नागेश लांडगे असे बेशुद्ध अवस्थेतसापडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १० एप्रिलला घडल्याचे उघड झाले आहे. प्रज्वल आणि नागेश खास मित्र असल्याची माहिती आहे. प्रज्वल हा माणिकगड मार्गावरील गॅरेजमध्ये काम करत होता. तर त्याचे वडील गोवर्धन चिमूर येथे आणि आई शीतल नवले गृहणी असून ती गडचांदूर येथे राहतात. त्याचे वडील आणि आई विभक्त असून प्रज्वल आईकडे राहत होता. बुधवारी त्याचा मित्र नागेश लांडगे हा प्रज्वलला भेटायला घरी गेला होता.
दरम्यान या भेटीमध्ये नागेशच्या हालचालीवरून प्रज्वलच्या आईला थोडी शंका आली. यावेळी आईने नागेशचा मोबाइल ताब्यात घेतला. आईने मोबाइल ताब्यात घेतल्याने आपले सर्व बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात निर्माण झाली. यावर त्याने प्रज्वला विनंती करून आईकडून त्याचा मोबाइल परत मागितला आणि आईने प्रज्वलला देखील त्याचा मोबाइल मागितला. मात्र प्रज्वलने प्रथम नकार दिला व नंतर नागेशचा मोबाइल परत करण्याच्या बदल्यात स्वतःचा मोबाइल आईला दिला. नागेशचा मोबाइल परत मिळाल्यानंतर लगेच दोघे सायंकाळी सायकलने घराबाहेर गेले. त्यानंतर नेमकं काय घडलं हे आद्याप कळू शकलेलं नाही. दुसऱ्या दिवशी ( गुरुवारी ) सकाळी प्रज्वल मृतावस्थेत तर नागेश बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची बातमी कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस पुढील तपास करत आहे. सध्या या घटनेचे गूढ कायम आहे. नेमकं हे प्रकरण कश्यामुळे झालं हे शोधून काढणं आता पोलिसांपुढेच एक आवाहन आहे.