समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण (फोटो सौजन्य: Freepik)
शिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता पुणे जिल्ह्यातील न्हावरा (ता.शिरुर) येथील अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित युवती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी चाललेली असताना गावातील कुणाल गारगोटे हा युवतीजवळ आला. त्याने युवतीशी बोलत ‘मी तुला कॉलेजला सोडतो’ असे म्हणून दुचाकीहून युवतीला बळजबरीने शिरुर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन जात युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा युवतीला न्हावरा येथे आणून सोडून देऊन कुणाल निघून गेला.
हेदेखील वाचा : शैक्षणिक क्षेत्राला काळिमा! ‘बदलापूर’ची पुनरावृत्ती, शाळेतील सेवकाचा 10 वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार
याबाबत पीडित युवतीने आपल्या पालकांना सांगत घटनेबाबत शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी कुणाल अशोक गारगोटे (रा. गारगोटे वस्ती न्हावरा ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांत तक्रार आल्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
शाळेतील सेवकाचे चौथीतील विद्यार्थ्यासोबत अश्लिल कृत्य
दुसऱ्या एका घटनेत, नांदेडमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली होती. शाळेत सेवकाने चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. शहरातील प्रसिद्ध ज्ञानमाता विद्या विहार शाळेत गुरुवारी (6 मार्च) दुपारी प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थ्यांने या घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीचे नाव सबसिंग मच्छल (वय ५०) आहे.