File Photo : Kolhapur Rain
गगनबावडा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गगनबावडा तालुका पावसाचं माहेरघर म्हटलं जातं. या तालुक्यामध्ये गेले आठ दिवस जोरदार उन्हाचा तडाका होता. परंतु, 23 तारखेला संपूर्ण तालुक्यामध्ये इतर ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास जोराचा पाऊस झाला. यानंतर गगनबावडा तालुक्याच्या ठिकाणी मेघगर्जनेसह ढगफुटी सुमारे तीन तास जोरदार झाली. या ढगफुटीचे वाहणारे पाणी इतके प्रचंड होते की, येथील शंकर मर्गज यांच्या घरात पाणी शिरले. त्याचबरोबर भुईबावडा घाट येथील घाटाच्या सुरुवातीला असणारे छोटेसे मंदिर काही वाहून गेले.
या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटातील दरड कोसळली. तसेच करूळ घाटातील नवीन सुरू असलेला रस्ता या रस्त्यातील मोहरीमध्ये काही ठिकाणी पाण्यातून माती व झाड येऊन तटल्यामुळे अनेक ठिकाणी मोहरीतील नळे चॉकअप होऊन रस्त्यावर पाणी आले. गगनबावडा अतिवृष्टीचा तालुका आहे पण गेल्या 30 वर्षांमध्ये असा पाऊस झाला नव्हता. कालचं ढगफुटीने तीन तासात बऱ्याच ठिकाणी खूप नुकसान झाले आहे.
ग. गो. जाधव महाविद्याय, एमटीडीसी, पोलीस स्टेशन, गगनबावडा कातळी फाटा या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते. तसेच गगनबावडा येथील शंकर मर्गज यांचे घरी पाणी शिरले होते. त्यांचेही घरगुती संसारिक साहित्याचे खूप नुकसान झाले आहे. भुईबावडा घाट जवळजवळ 13 ठिकाणी दरडी कोसळले आहेत. तसेच रस्ता तुटला गेला आहे. ढगफुटीतून ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी.