Photo Credit- Social Media
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बीडसह राज्यातील अनेक भागातील गुन्हेगारीच्या, हत्येच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सक्रिय भूमिका घेतली. त्यांनी या हत्येच्या निषेधार्थ आवाज उठवला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी पोलिस आणि प्रशासनाला आवाहन केले की, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली होती.
या प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी आता आणखी एक प्रकरणात आवाज उठवला आहे. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द गावचा तरुण रत्नशिव संभाजी निंबाळकर यांचा 12 मार्चला निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
ChatGPT चा वापर न करताही तयार करू शकता Ghibli-Style ईमेज, Grok AI सह हे टूल्स करणार तुमची मदत
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रत्नशिव निंबाळकर यांची पत्नी प्राजक्ता निंबाळकर यांनी बहीण शीतल शिंदे आणि त्यांच्या लहान मुलांसह अंजली दमानियांची भेट घेतली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांचीही भेट घेत पोलिसांनी या प्रकरणात त्वरीत कारवाई करून मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणात लक्ष घालून रत्नशिव निंबाळकर प्रकरणात तातडीने कारवाई कऱण्याचे निर्देश दिले आहेत.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या प्रकऱणाकडे लक्ष वेधलं आहे. “आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं.३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं.
रत्नाशीलनी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रयनी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला.१२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ?
आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं.
३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला.
आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती.… pic.twitter.com/8gaZYyYZsw
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 28, 2025
ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.” असं लिहीत त्यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची विनंती केली आहे.