रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी (फोटो- सोशल मिडिया)
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक सज्ज
रत्नागिरी जिल्ह्यात लाखों पर्यटक दाखल
जिल्हा पोलिस यंत्रणा पूर्णपणे दक्ष
रत्नागिरी: सरत्या २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन २०२६ या नववर्षाचे भव्य स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या कोकणात, विशेषकरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची अभूतपूर्व गदर्दी झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या मोठ्या जल्लोषाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जिल्हा पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांना आवाहन केले आहे की, त्यांनी नववर्षाचा सोहळा पूर्ण आनंदात साजरा करावा, पण त्याच वेळी सर्वांनी योग्य खबरदारी घेऊन दक्षता बाळगावी. उत्साहाच्या भरात होणारी हुल्लडबाजी, अतिउत्साह आणि कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन टाळण्यासाठी पोलीस दल ‘अलर्ट’ मोडवर आले आहे. मंगळवार ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील चारही उपविभागीय पोलिस अधिकारी क्षेत्रांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
New Year Party: कोकणच्या समुद्रकिनारी होणार नववर्षाचा जल्लोष
कायदा-सुव्यवस्थसाठा विशेष बंदोबस्त तैनात
यामध्ये पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश आहे. यासोबतच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोड – देण्यासाठी बॉम्ब शोचक व नाशक पथके (BDC) आणि त्यारित प्रतिसाद पथके -QRT) देखील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, यावर्षीही मोठी गर्दी असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने खबरदारी म्हणून पूर्ण तयारी केली आहे. विशेषतः दापोली, गणपतीपुळे, गुहागर यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वाहतूक कौडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
कोकणच्या समुद्रकिनारी होणार नववर्षाचा जल्लोष
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी यंदा पर्यटकांनी गोव्यानंतर कोंकण पट्टयाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण, तुलनेने कमी गर्दी आणि परवडणारा खर्च यामुळे कोंकण पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे पुढे आले आहे. विशेषतः मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी शहरांतील पर्यटक मोठ्या संख्येने कोंकणातील विविध पर्यटनस्थळांकडे रवाना झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, देवस्थाने आणि निसर्गरम्य स्थळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






