काय घडलं नेमकं?
विश्वकर्मा कुटुंब हे राहुल नगर येथे वास्तव्याला आहे. विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. यापैकी दोघेजण घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील विश्वकर्मा (वय 40) आणि त्यांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा असे आहे. सुनील विश्वकर्मा यांनी घरात पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरून सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या दोन भावांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की यांच्यामध्ये हाणामारी सुरु झाली. त्यादरम्यान संपूर्ण कुटुंबावर धारधार शास्त्राने वार केले. यामध्ये सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्लोक याला रुग्णलयात नेत असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. सुनील विश्वविक्रमा यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपी अटकेत असून तपास सुरु
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सुरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी पोलीस करत आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेत फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु केला आहे. या हल्ल्यामागे केवळ गाणी लावण्यावरून हा वाद झालेला असावा असं नसून आणखी काहीतरी मोठे कारण असू शकते त्यादृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. पोलीस या दोघांची कसून चौकशी करत आहेत. पुढील कारवाई सुरु आहे.
Ans: मुंबईतील विक्रोळी पार्कसाईटच्या राहुल नगरमध्ये.
Ans: दोघांचा.
Ans: दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.






