मालेगाव : भाजपमधून (BJP) शिवसेना (Shivsena) उध्दव ठाकरे गटात (UBT) प्रवेश करणाऱ्या डॉ.अद्वय हिरे (Dr Advay Hire) यांची उपनेते पदावर नियुक्ती होताच डॉ.हिरे यांना सत्ताधारी शिंदे गटाने (Shinde Group) घेरण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. मालेगाव (Malegaon) शहरात उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी झाल्यानंतर डॉ. हिरे यांच्याविरोधात शहरातील दोन पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून डॉ.अद्वय हिरे यांच्यासह त्यांच्यासह ३२ जणांवर हा गुन्हा करण्यात आहे. शिवाय सटाणा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राखीव शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बागलाण तालुक्यातील वनोली येथील राजेंद्र दत्तू गांगुर्डे (३०) यांनी छावणी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. डॉ.हिरे यांच्यासह अन्य तिघांनी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या रावळगाव येथील युनिट मध्ये राखीव शिक्षक या पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून संस्थेच्या कार्यालयात दि.४ फेब्रुवारी २०२१ रोजी १० लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
[read_also content=”अवघ्या १०० रुपयांची पर्स विकून महिलेने कमावले ९ लाख रुपये, जाणून घ्या काय आहे त्याची खासियत https://www.navarashtra.com/viral/omg-news-woman-earned-9-lakh-rupees-by-selling-a-purse-of-just-100-rupees-know-what-is-its-specialty-nrvb-380183.html”]
महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती मध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. त्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यामध्ये सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून दूसरा गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या प्रकरणात शहरातील द्याने भागातील रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेविरूद्ध रमजान पुरा पोलीस ठाण्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे बँकेचे विभागीय अधिकारी गोरख रामचंद्र जाधव यांनी संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संस्थेने ३१ कोटी ४० लाख ७६ हजार रूपयांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना राजकीयदृष्ट्या आव्हान देणाऱ्या हिरे कुटुंबातील व्यक्तींचा तक्रारीत समावेश असल्याने गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे.
[read_also content=”अलर्ट! रायगडच्या किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट, बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-news-suspicious-boat-found-near-raigad-coast-sources-informed-that-there-is-a-pakistani-citizen-on-the-boat-nrvb-380207.html”]