ठाणे : भिवंडी येथील एका शाळेच्या विद्यार्थिनीच्या रिक्षा चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीने स्वरक्षणासाठी दप्तरातील कर्कटकचा वापर करुन रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानांतर रिक्षातून बाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचवला.
डोंबिवलीत क्रूर कृत्य; सख्या भावानेच केला बहिणीवर लैगिंक अत्याचार; तब्बल १० वर्षांनी सुनावली शिक्षा
नेमकं काय घडलं?
१६ वर्षीय मुलगी हि भिवंडी येथी शांतीनगर भागात तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. ती भिवंडी येथील एका शाळेत इयत्ता १० वीचे शिक्षण घेत आहे. ९ जुलैला ती दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी निघाली होती. घराच्या जवळ तिने रिक्षा पकडली. त्यावेळी ती रिक्षामध्ये ती एकटीच प्रवास करत होती. रिक्षा काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी एका प्रवासी रिक्षामध्ये बसला. शाळेजवळ रिक्षा पोहोचल्यानंतर तिने रिक्षा चालकास थांबण्यास सांगितले. परंतु त्या चालकाने रिक्षा थांबवली नाही. त्यानंतर रिक्षामधील प्रवाशाने तिला गप्प बसण्यास सांगितले. तिला रिक्षाला चालक चाविंद्र येथे घेऊन जात होता. त्यावेळी समय सूचकता दाखवत विद्याथीनीने दप्तरातील कर्कटक बाहेर काढून रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानंतर शेजारी बसलेल्या प्रवाशास धक्का मारून रिक्षातून उडी मारत पळ काढला. ती शाळेत पोहचली. शाळेतून घरी आल्यानंतर तिने याबाबतची माहिती तिच्या आई आणि वडिलांना सांगितली.
त्यांनी ११ जुलैला या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम १३७ (२) आणि ६२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून शोध सुरु केला आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक ! आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर लैंगिक अत्याचार
दरम्यान , आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित तरुणीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून अत्याचार केल्याची गंभीर तक्रार अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे
पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, 2 जून 2025 रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या महिला या तिला ‘शेतात चल’ असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या. वाटेत एका गाडीतून आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले. तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, अत्याचाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अहिल्यानगर शेवगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.
पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा खून, हाताची बोटेही तोडली; कारण…