काय नेमकं प्रकरण?
अमोल एकनाथ बारे (30) याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी तो आपल्या पत्नीला घटस्फोट मागत होता. अमोलची पत्नी आणि युवराजची पत्नी चुलत बहिणी आहेत. त्यामुळे युवराज दाम्पत्याने आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे असे अमोल त्यांना सांगत होते. मात्र अमोलच्या पत्नीने नकार दिल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढत गेला.
काय घडलं नेमकं?
४ जानेवारीला रात्री अमोलने युवराजला फोन केले आणि फोन करून शिवीगाळ व धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या युवराजने प्रमोद वाकचौरे आणि शुभम राठोड यांना बोलावून घेतले. अमोलला दुचाकीवर बसवून ओअॅसिस चौक परिसरात नेण्यात आले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. प्रमोदने धारदार चाकूने अमोलच्या छाती, गळा व पाठीत वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी हत्येनंतर तेथून फरार झाले.
पोलिसांचा 1800 किमी पाठलाग आणि…
अमोलची हत्या केल्यानंतर आरोपी हे सतत आपले ठिकाण बदलत होते. नवीन सिमकार्डचा वापर करत होते त्यामुळे त्यांचा लोकेशन ट्रॅक करणे पोलिसांपुढे आवाहन होते. पैसे संपल्याने जालना येथे रक्कम गोळा करून ते परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन व गोपनीय माहितीनुसार जालना,अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह 13 जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली. अखेर 1800 किलोमीटरचा प्रवास करून जालना बसस्थानक परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली.
Ans: घटस्फोट आणि कौटुंबिक वादामुळे.
Ans: तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे.
Ans: जालना बसस्थानक परिसरातून.






