जयपूर – संतत्वाचा गाजावजा करणारे आणि आता कैदेत असलेले आसाराम बापू (Asaram Bapu) पुन्हा चर्चेत आले आहेत. विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी (Sexual Abuse Of A Student Case) अनेक वर्ष जेलमध्ये (Jail) असलेल्या असाराम बापूंच्या अडचणी आणखी वाढलेल्याच दिसतायेत.
सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये (Jodhpur Central Jail) आसाराम बापू (Asaram Bapu) कैदेत आहेत. जामीन मिळवण्यासाठी त्यांच्याकडून होत असलेले सगळे प्रयत्न विफल होतायेत. प्रत्येक वेळी नवनवी कारणे देत आसाराम बापू जामिनासाठी अर्ज करतात, मात्र कोर्टाकडून तो फेटाळण्यात येतोय.
आता नव्या दिलेल्या कारणामुळं Asaram Bapu पुरतेच अडकले आहेत. जुन्या खटल्यात त्यांना जामीन मिळाला नाहीच, उलट त्यांच्या नावे नवी केस आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता यापुढं जामीन मिळवण्याचा मार्गही आसाराम बापूंसाठी खडतर असेल, असे सांगण्यात येतेय. जामिनाच्या प्रयत्नात आसाराम बापूंवर रातनाडा पोलीस ठाण्यात नवा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
[read_also content=”भारताविषयी जेवढी उत्सुकता भारतीयांना आहे, तेवढीच विदेशी लोकांना देखील आहे, भारताविषयी लोकांमध्ये सकारात्मकता आहे- पंतप्रधान मोदी https://www.navarashtra.com/maharashtra/pm-modi-mumbai-visit-live-updates-mumbai-is-number-one-on-narendra-modi-popularity-nrvb-362994.html”]
आजारी असण्याचं, सत्संग करण्यासाठी, कुटुंबाला भेटण्यासाठी, शिष्यांना दर्शन देण्यासाठी, अशी वेगवेगळी कारणं आत्तापर्यंत आसाराम बापूंनी जामीन मिळवण्यासाठी पुढं केलीत. मात्र सेशन कोर्ट आणि हायकोर्टानं त्यांना एकदाही जामीन दिलेला नाही. अवनेक वर्षांपासून त्यांना जेलमध्येच राहावं लागतंय. जामीन मिळत नसल्यानं आसाराम बापूंनी एक गंभीर आजार झाल्याचं बनावट प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. स्वताला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी जामिनासाठी आजाराचं बनावट प्रमाणपत्र थेट सुप्रीम कोर्टातच सादर केलं. हे सगळं प्रकरण २०१७ सालातील असल्याचं सांगण्यात येतंय. यात आसाराम बापूंचे वकील रवीराय यांचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात रवीराय यांनीच आसाराम बापू यांना मदत केली आणि आजाराचं बनावट प्रमाणपत्र मिळवून दिलं, असा आरोप करण्यात येतोय.
[read_also content=”सायबर चोरट्यांनी मारलाय मोठा हात, थेट Usain Bolt च्या खात्यावरच मारला डल्ला आणि १०१ कोटी हडपले? वाचा नेमकं प्रकरण https://www.navarashtra.com/crime/cyber-crime-usain-bolt-127-million-dollars-missing-from-account-fraud-in-jamaica-nrvb-362977.html”]
सुप्रीम कोर्टात हे आजाराचं बनावट प्रमाणपत्र असल्याचं समोर आलंय. त्यानंतर हे सगळं कांड आता आसाराम बापूंवरच उलटलंय. या सगळ्या प्रकरणात आसाराम बापू (Asaram Bapu) आणि रवी राय (Ravi Rai) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानंच दिले. तर या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा आता आसाराम बापू करतायेत. रवीराय याला ओळखत नसून अ्सं काहीही केलं नाही, असा दावा बापू करतायेत. आता या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु झाला आहे.