मावळ तालुक्यात लेडीज डान्सबार खुलेआम सुरु; मध्यरात्रीपर्यंत लाखोंची उधळण
घरात कोणीच नसतांना संपवले जीवन
कृष्णा नंदकिशोर लड्डा (वय 27) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी, गावात आठवडी बाजार असल्यामुळे त्याचे वडील खताच्या दुकानात कामासाठी गेले होते. तर त्याची आई आणि बायको माजलगाव येथे आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेल्या होत्या. घरी कुणीच नसतांना, कृष्णाने घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
दुपारी 12.30च्या सुमारास कृष्णाचे वडील हे जेवण करण्यासाठी घरी परतले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. लड्डा कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. कृष्णा हा आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. तो आपल्या आई, वडील आणि पत्नी यांच्या सोबत राहत होता. कृष्ण हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
ग्रामसेवकाला गावगुंडांची अमानुष मारहाण; शरीर काळे-निळे, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल
बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या घटना काही कमी होतांना दिसत नाही आहे. गेवराई तालुक्यातील नांदगाव ग्रामसेवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामसेवकाला करण्यात आलेली मारहाण एवढी जबर होती की ग्रामसेवकाच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले आहे. त्याचे शरीरी काळे-निळे पडले असून रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले आहे. मारहाण झालेल्या ग्रामसेवकाचा नाव जालिंदर सुरवसे असे आहे.
लाथा बुक्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सुरवसे यांनी ही मारहाण केली. ग्रामसेवकाला गावगुंडांनी का मारहाण केली याची माहिती समोर आलेली नाही आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामसेवक जालिंदर सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सुरवसे यांची आई आणि बहीण यांच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली आहे.
Kalyan Crime: टोपीवरून शेजाऱ्यांत राडा, गरोदर महिलेच्या पोटात मारली लाथ; गर्भातील बाळाचा मृत्यू
Ans: शुक्रवारी दुपारी, घरात एकटाच असताना फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला.
Ans: वडील कामावर, तर आई व पत्नी माजलगाव येथे शिवमहापुराण कथा ऐकायला गेल्या होत्या.
Ans: सध्या कोणतंही ठोस कारण समोर आलेलं नाही; तपास सुरू आहे.






