काय घडलं नेमकं?
कल्याणजवळ मोहने येथील लहुजीनगर परिसरात बिगर कांबळे हे राहतात. त्यांनी डोक्यावर टोपी घातली होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नवाब शेख नावाच्या तरुणाने ही टोपी कांबळे यांच्या डोक्यावरून काढून स्वतःकडे घेतली. त्यानंतर नवाब शेख यांच्या डोक्यावर असलेली टोपी मोनू फुलोरा नावाच्या व्यक्तीने काढली आणि परत बिगर कांबळे यांना दिली. यावरून नवाब शेख संतापला.
नवाब शेख आणि त्याच्या तीन नातेवाईकांनी मोनू फुलोरीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या हातात हॉकी स्टिक आणि दांडके होते. मोनूला वाचवायला मोनूची मावशी वैशाली भालेराव ही आली. तर नवाब आणि त्याच्या नातेवाईकांनी तिच्यावर देखील हल्ला केला. नवाब शेख याने वैशालीच्या पोटात जोरात लाथ मारली. यात वैशाली यांच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. वैशाली भालेराव यांच्यावर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी नवाब शेख, अफसर शेख, शब्बीर शेख आणि शाहरुख शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
घरकाम करणारी महिला चार दिवस गैरहजर; संतापलेल्या मालकिणीच्या मुलाने रोखली बंदूक, ठाण्यातली घटना
ठाण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घरकाम करण्यासाठी न आल्याने घर मालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेमध्ये वाद झाला. या वादात घर मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना ठाण्यातील कासारवडवलीमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी घर मालकीण आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ती बंदूक खरी नसून अगदी बंदुकीसारखा हुबेहूब दिसणार लायटर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Ans: कल्याणमधील मोहने, लहूजीनगर परिसरात.
Ans: डोक्यावरील टोपीवरून शेजाऱ्यांत वाद झाला.
Ans: चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






