Hingoli Crime: 69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…
नेमकं काय घडलं?
मृत व्यक्तीचं नाव रामभाऊ विठ्ठल गायकवाड (वय 73) असं असून आरोपी नातवाचं नाव शुभम बाळू गायकवाड (वय 27) आहे. रामभाऊ हे पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांच्यासह परळीतील मिलिंदनगर भागात वास्तव्यास होते.
तपासात समोर आलं आहे की शुभम हा दारूच्या व्यसनाधीन असून तो वारंवार दारू आणि मोबाईलसाठी पैशांची मागणी करत होता. घटनेच्या दिवशी शुभमने आजोबांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र रामभाऊ यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून शुभमने आजोबांवर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
ही मारहाण छाती आणि पोटाच्या भागावर करण्यात आली होती. त्यामुळे रामभाऊ गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
संशयास्पद मृत्यूचा उलगडा
घटनेनंतर कुटुंबीयांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. चौकशीत नातवाने केलेल्या मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मृतकाच्या पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नातू शुभम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून 30 जानेवारी रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
परिसरात संतापाची लाट
दारू आणि पैशांच्या मागणीमुळे घडलेल्या या घटनेने मिलिंदनगर परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘कॉन्फिडेंट ग्रुप’च्या कार्यालयात थरार; छापेमारीत उद्योजकाने स्वतःवर झाडली गोळी
Ans: दारू व मोबाईलसाठी पैसे न दिल्यामुळे नातवाने आजोबांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
Ans: मृत व्यक्ती रामभाऊ विठ्ठल गायकवाड (73) असून आरोपी नातू शुभम बाळू गायकवाड (27) आहे.
Ans: संशयास्पद मृत्यूचा तपास करून नातवाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






