१० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी
जेवणात कायमच डाळभात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. तिखट डाळ, गोडी डाळ, मसूर आमटी किंवा कडधान्यांपासून बनवलेली अंती कायमच जेवणात खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला गरमागरम भातासोबत खाण्यासाठी आंबट तिखट कोकम कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोकणातील प्रत्येक घरात कोकम कढी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. जेवणाच्या ताटात जर कढी असेल तर चार घास जास्त जातात आणि जेवल्यासारखे वाटते. कोकम बाजारात सहज उपलब्ध असतात. लाल रंगाच्या फळापासून बनवलेले जाणारे कोकम तुम्ही मासे बनवताना किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. दुपारच्या जेवणात प्रत्येकाला कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी रेसिपी हवी असते. अशावेळी कोकम कढी हा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये कोकम कढी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’






