काय घडलं नेमकं?
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव रमेश बाबुराव भांगे हे केज तालुक्यातील माजी सरपंच आहे, तर दुसरा व्यक्ती हा नारायम राम पटेल आहे, तो मूळचा राजस्थानचा आहे. तो कृषी पंप व्यापारी आहे. हे दोघे त्यांच्या खाजगी कारने तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी (२८ जानेवरी) या दोघांनी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरताना त्यांनी 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. त्यानंतर तिथून ते निघून गेले. आरोपी निघून गेल्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटला. सतर्कता दाखवत त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस सापळा रचत मंजाथिदल चेकपोस्टवर त्यांची कार अडवली. जेव्हा कारची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 200 रुपयांच्या नोटांचे तब्बल 41 बंडल लपवून ठेवलेले आढळून आले. तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ज्याची एकूण रक्कम ८ लाख 37 हजार 800 रुपये इतकी आहे.
आरोपींनी काय दिली कबुली
पोलीस तपासादरम्यान आरोपींनी याआधीही बनावट नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे. मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर या परिसरात यापूर्वीही अनेक बनावट नोटा चलनात आणण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून, मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे
CID कडून सखोल तपास सुरू
या बनावट नोटा आरोपींना कोणी पुरवल्या? या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणाचा आश्रय मिळत होता? या सर्व प्रश्नांचा सखोल तपास गुप्त वार्ता विभाग आणि CID कडून करण्यात येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपासात आणखी धक्कदायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Ans: केज तालुक्यातील माजी सरपंच रमेश भांगे व कृषी पंप व्यापारी नारायण राम पटेल.
Ans: पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.
Ans: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तामिळनाडू CID व गुप्त वार्ता विभाग सखोल तपास करत आहेत.






