Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना
रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता…
प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेला तांदूळ शासकीय रेशन दुकानांतील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने अलीकडेच रेशन दुकानांतून पारंपरिक तांदळाऐवजी पोषणमूल्यांनी समृद्ध फोर्टीफाईड मिश्रित तांदळाचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, याच तांदळाचा मोठ्या प्रमाणात साठा ट्रकमधून वाहतूक होताना आढळल्याने संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पकडलेला तांदूळ काही स्थानिक महिला व्यापाऱ्यांनी विविध ठिकाणांहून खरेदी करून साठवून ठेवल्याचा संशय आहे. हा साठा पुढील विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी कारवाई केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
विशेष म्हणजे, संबंधित ट्रक यापूर्वीही सीएमआर केंद्रांपर्यंत मिलिंग केलेल्या तांदळाची वाहतूक करताना दिसल्याची माहिती समोर येत आहे. सीएमआर केंद्रातूनच रेशन दुकाने, शाळा व शासकीय वसतिगृहांना तांदूळ पुरवठा केला जातो. त्यामुळे याच साखळीतील धान्य काळ्या बाजारात वळविले जात असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मूल येथील एका मोठ्या तांदूळ पुरवठादाराकडे संबंधित ट्रक कार्यरत असल्याची चर्चा आहे. याआधीही ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. सन २०२३ मध्ये संबंधित महिला व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तादूळ साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या व प्रमाणपत्रांच्या आधारे कारवाई टळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यावेळीही तांत्रिक कागदपत्रांच्या आधारे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.
गोंडपिपरी तालुक्यातील रेशन दुकानांसाठी असलेला फोर्टीफाईड मिश्रित तांदूळ अवैधरित्या खुल्या बाजारात वळविला जात असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी २०० क्विंटल तांदूळ भरलेला ट्रक पकडल्याने पुरवठा साखळीतील गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. जप्त तांदूळ शासकीय रेशन साठ्यातील असल्याचा संशय असून, सीएमआर केंद्रातूनच काळ्या बाजारात वळविला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. याप्रकरणी काही महिला व्यापारी व मोठ्या पुरवठादारांची भूमिका संशयास्पद असून, याआधीही अशाच प्रकारच्या तक्रारी व कारवाया झाल्या आहेत. प्रकरण दाबले जाण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.






