राज्यात काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्था स्थापन करून सर्वसामान्य लोकांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. या ठेवींचा अनेक ठिकाणी गैर वापर करण्यात आला. पतसंस्थांमधील संचालकांनी आपापसात कर्ज वाटप करून घेतले होते. हे कर्ज घेतल्यानंतर न कोणते तारण ठेवले. संचकानी बनावट कागदपत्र तयार करून स्वत: कर्ज घेतले आणि आपल्या इतर नातेवाईकांना देखील कर्ज दिले होते. हा प्रकार घडला होता. पॅट संस्थांच्या या बोगस कारभारामुळे अनेक संस्था अडचणीत आल्या होत्या. याप्रकरणी आता पतसंस्थांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयामुळे पत संस्थांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणात अहमदनगर जिल्हा न्यायालयाकडून ५ जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच पत संस्थेचे कर्ज न भरणाऱ्या १२ संचालकांना आणि कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ३ ते १० वर्षांची शिक्षा दिली जाणार आहे. पतसंस्था घोटाळ्यामध्ये जन्मठेप झालेला हा पहिलाच जिल्हा आहे.
कोणाला शिक्षा करण्यात आली
अहमदनगर शहरामध्ये एक पतसंस्था होती. या पत संस्थेतील घोटाळ्या प्रकरणी पाच जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. यामध्ये आरोपी ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे जा पाच जणांची नावे आहेत. या आरोपीना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी सगळ्यात मोठी जन्मठेप सुनावली आहे. संपदा नागरी सहकारी पत संस्थेमध्ये ११ हजारांपेक्षा जास्त सर्व सामान्य नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत.
कोर्टाकडून कर्जदारांना दणका
कोर्टाकडून देण्यात आलेल्या या महत्वाच्या निर्णयामुळे कर्ज न भरणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १२ संचालक आणि कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सगळ्यांनी १३ कोटी ३८ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी २०११ मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात १७ जणांना दोषी ठरवण्यात आले.
कर्जदारांनी पत संस्थेच्या पैशांतून घर, गाडी घेतली
पत संस्थेकडून घेतलेल्या कर्जातून अनेक कर्जदारांनी जमीन, कार, घर खरेदी केल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयाने दोषारोपत्र दाखल केले. त्यानंतर १७ वर्षांनी यावर निकाल देण्यात आला. कोर्टाने दिलेल्या निकालानुसार ज्ञानदेव वाफारे हे मुख्य आरोपी आहेत. तर त्यांच्या पत्नीचा यात सहभाग असल्याने त्यांना देखील जन्मठेप सुनावण्यात आली आहे.