फोटो सौजन्य - Social Media
मोखाडा – दीपक गायकवाड: मोखाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास मोठी कामगिरी करत बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून तब्बल ₹२,४१,३२० किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे. या कारवाईचं नेतृत्व मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी केलं. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दादरा नगर हवेली, दमन आणि दिव येथून एक सफेद रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी नाशिकच्या दिशेने बेकायदेशीर दारू वाहून नेत आहे. ही माहिती मिळताच सकाळी ५.३० वाजता सापळा रचून गाडी थांबवण्यात आली आणि वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या दारूत खालील ब्रँडचा समावेश आहे:
संपूर्ण दारू साठा पोलिसांनी जप्त केला असून आरोपीवर बेकायदेशीर मद्य वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले करत आहेत. मोखाडा पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध आणि शिताफीने ही कारवाई पार पाडली आहे. या घटनेमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सर्वच स्तरातून या कारवाईचं कौतुक होत आहे.