फोटो सौजन्य: गुगल
नवी मुंबई/सावन वैश्य: नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून, लाखो रुपयांच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत करोडो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून,नशा मुक्त नवी मुंबईच्या दिशेने पोलिसांची वाटचाल सुरू असल्याचं अधोरेखित होत आहे.
नशा मुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व अंमलदार, यांच्यासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध ठिकाणी छापे मारून करोडो रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.
नशा मुक्त नवी मुंबई या जनजागृतीसाठी सुप्रसिद्ध अभिनेते जॉन इब्राहम यांना देखील बोलवण्यात आले होते. जेणेकरून नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांचे मतपरिवर्तन होऊन ते नशेपासून दूर जातील. अशा प्रकारे नवी मुंबईतून अंमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पोलीस नाना प्रकारे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तरी देखील अमली पदार्थाच्या माध्यमातून नवी मुंबईला पोखरणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तर त्यांच्याजवळून करोडो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी सन2024 मध्ये 13 कोटी
8 लाख 29 हजार 880 रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केलेत, तर 14 कोटी 33 लाख 34 हजार800 रुपयांचे कोकेन देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. 24 लाख 54 हजार रुपयांचे एमडीएमए एक्स्ट्रासी पोलिसांनी जप्त केले, तर 68 लाख 31 हजार 225 रुपये चा गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय. तसेच30 लाख 10हजार रुपयांचे ब्राऊन शुगर पोलिसांनी जप्त केलेत. तर 33 लाख 55हजार रुपयांचे एलएसडी पेपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी विविध ठिकाणी मारलेल्या धाडीत 67 लाख 81 हजार रुपयांचे चरस जप्त केले असून, 47 लाख 51 हजार रुपयांचे हेरॉईन देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. तसेच ५५ हजारांचे मेथेडॉन, ३ हजार २६४ रुपयांचे कोडाईन, ४३ हजार ८०० रुपयांचे इतर अमली पदार्थ, त्याचबरोबर १ करोड 28 लाख 32हजार 476 रुपयांचा गुटखा, 1हजार 100 रुपयांचा कोपटा, तर ३ लाख 81 हजार 169 रुपयांचा हुक्का असा एकूण 33करोड 68 लाख 14हजार 244रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नशा मुक्त नवी मुंबई ठेवण्यासाठी पोलिसांसोबतच शहरातील नागरिकांचे सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. परिसरात अथवा आसपास अशा प्रकारच्या संशयास्पद काही हालचाली आढळून आल्यास, 8828112112 अथवा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.