काय घडलं नेमकं?
प्रणय हा शेअर मार्केटचा व्यवसाय करतो, तर गौरव एका सीएकडे नोकरी करत होता. प्रणय आणि गौरव या दोघांनी एका तरुणीला मुंबईवरून पार्टीसाठी बोलावले होते. या दरम्यान गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रणय, गौरव आणि त्यांची मैत्रीण हे तिघे विमानतळ परिसरातील दाबो या पबमध्ये गेले मध्यरात्रीनंतर हे तिघे डान्स करतांना पाच जणांच्या एका ग्रुपसोबत त्यांचा वाद झाला. यात काही तरुणांनी तरुणीशी अश्लील चाळे केल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून दोन्ही गटात वाद पेटला. यवादाचे रूपांतर हाणामारीत होत असल्याचे लक्षात आले आणि पबच्या व्यवस्थापकांनी या दोन्ही गटांना पब बाहेर काढले.
त्यानंतर भररस्त्यात हा राडा झाला. यात प्रणय आणि गौरव पाच जणांच्या गटाने दगड, लोकांडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. ज्यामध्ये प्रणयाचा जागीच मृत्यू झाला तर गौरवच्या बरगड्यांना मार लागला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच पैकी मेहुल रहाटे आणि हनी उर्फ तुषार अनिल नानकानी (रा. कामठी) यांना अटक केली आहे. तर अन्य तिघांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करत आहे.
दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या
नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यानेच माय-लेकीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ भांडणामुळे ही हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने लाकडी दांड्याने मायलेकीवर हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेजारी हा हत्येच्या वेळी दारूच्या नशेत होता. आरोपीच नाव निलेश ठाकरे (31) असे आहे. तर मृतकाचे नाव पर्वता फुकट (65) व त्यांची मुलगी संगीता रिठे (40) असे आहे. ही घटना उमरेड गांगापुर कालवा परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसर हादरला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
Ans: विमानतळ चौकातील दाबो पबसमोर, पहाटे चारच्या सुमारास.
Ans: पबमध्ये डान्स करत असताना तरुणीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप.
Ans: खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक, तीन आरोपी फरार.






