पुणे शहरात घरफोडींचा जोर (फोटो- istockphoto)
कोथरूड, बाणेर, हडपसरमध्ये लाखोंचे ऐवज लंपास
बंद घरांमध्ये चोरट्यांच्या घरफोडींचा सिलसिला सुरु
घरांमधून लाखो रुपयांचे ऐवज चोरीला
पुणे: पुणे शहरातील बंद घरांमध्ये चोरट्यांच्या घरफोडींचा सिलसिला सुरु आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये कोथरूड, बाणेर आणि हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घरांमधून लाखो रुपयांचे ऐवज चोरीला गेले आहेत. कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीत एका सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपट केले. या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलांचे कुटुंब बाहेरगावी असताना गुरुवारी (२७ नोव्हेंबर) पहाटे ही घटना घडली. सकाळी रहिवाशांनी ही माहिती महिलेला दिली. सहायक निरीक्षक शुभांगी देशमुख तपास करत आहेत.
बाणेर परिसरात बंद फ्लॅटमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपट केले. ३२ वर्षीय तरुणाने याबाबत बाणेर पोलिसात तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक रायकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.हडपसरमधील फुरसुंगी परिसरात विवाह समारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी छतावाटे प्रवेश करून कपाटातील एक लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपट केले. या घटनेची नोंद ३३ वर्षीय व्यक्तीने फुरसुंगी पोलिस ठाण्यात केली. पोलिस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.सध्या या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नागरिकांना घराची सुरक्षा अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला आहे.
फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक
पिंपरी चिंचवड परिसरात वडमुखवाडी या परिसरात जमिनीच्या वादातून नितीन गिलबिले याची हत्या करण्यात आली होती. दोन मित्रांनी नितीनला गाडीत बसवलं आणि त्या नंतर जवळून डोक्यात गोळी घातली आणि मृतदेह तसंच फेकून दिला. हत्या केल्यानंतर तीन आरोपी फरार झाले होते. त्यातील एकाला वाघोलीमधून अटक करण्यात आली होती.
Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार
मात्र दोन आरोपी फरार होते. त्या आरोपींचा ताम्हिणी घाटात वावर असल्याचं समोर आल. एक विना क्रमांक असलेली गाडी उभी होती. ही गाडी हत्येमध्ये वापरण्यात आली होती. या प्रकरणात विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आणि एका अमित पठारे याला अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्र फिरवली आहेत. वेगवेगळ्या दिशेने या प्रकरणात आता तपास केला जात आहे. मात्र आरोपीनी एका माजी नगरसेवकाच नाव घेतलं आहे. या दिशेने सध्या पोलिसांकडून तपास केला जात आहे.






