गुमला : झारखंडमधील (Jharkhand) गुमला जिल्ह्यातील (Gumla District) भरनो पोलीस स्टेशन (Bharno Police Station) हद्दीतील नवाटोलीजवळ (Navatoli) रविवारी लक्ष्मी रथ नावाची प्रवासी बस (Passenger Bus) आणि स्कॉर्पिओ कार (Scorpio Car) यांच्यात धडक झाली. या अपघातात स्कॉर्पिओ चालक (Scorpio Diver) वगळता कोणालाही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये संत अण्णा इंटर कॉलेज चैनपूरच्या ४० विद्यार्थिनी आणि ५ शिक्षक होते.
बसमधील सर्व लोक शैक्षणिक दौऱ्यासाठी रांची पत्राटूच्या दिशेने जात होते. दरम्यान, भरनो ब्लॉकच्या NH 23 रांची-गुमला मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ बसची नवटोलीजवळ धडक झाली. मात्र, बस चालकाने समजूतदारपणा दाखवत बस आपल्या नियंत्रणात ठेवत शेतात उतरवली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
[read_also content=”मुलीची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आणि रक्तरंजित कारस्थान… ७२ तासांत अशी उघड झाली मर्डर मिस्ट्री https://www.navarashtra.com/crime/up-meerut-crime-news-preeti-singh-murder-case-murder-mystery-72-hours-revelation-murderer-father-arrest-motive-bloody-conspiracy-police-nrvb-367565.html”]
या घटनेत स्कॉर्पिओ चालक किरकोळ जखमी झाला आहे. तो रांचीहून गुमला येथे एकटाच येत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षकांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनी आणि शिक्षकांना दुसऱ्या वाहनातून रांचीला पाठवण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी नुकसान झालेले वाहन ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. याशिवाय जखमी स्कॉर्पिओ चालकाला प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
[read_also content=”जित्याची खोड! दहशतवाद्यांची भरती, हैदराबादमध्ये हल्ल्याची तयारी… लष्कराने भयानक कट उधळून लावला https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-truth-pakistan-was-planning-to-terrorists-attack-on-hyderabad-india-nrvb-367569.html”]