File Photo : Beaten
साक्री : तालुक्यातील जामदा येथे भंगारचा माल घेण्यासाठी आलेल्या सुरतच्या तिघा व्यापाऱ्यांना जंगलात नेत मारहाण करत लुटल्याची घटना घडली. त्यांना जंगलात नेऊन हात-पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोकडसह सोने असा साडेतीन लाखांचा मुद्देमालही हिसकावून नेला. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
हेदेखील वाचा : नववीत शिकणाऱ्या मुलाकडून तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना
याबाबत पुतिनकुमार शर्मा (वय ३० रा. पटेल पंचायत पार्क, बरेली सुरत) या व्यापाऱ्याने निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून जामदा येथून फोन आला होता. त्याने तुम्ही भंगारचा व्यवसाय करता का? अशी विचारणा करत माझ्याकडे 300 टन भंगार असल्याचे सांगितले. त्यानुसार, शर्मा यांनी भंगारचा व्यापार करणारा मित्र मोहम्मद तारीफ अली व कुलदिप यास याबाबत सांगितले. त्यानंतर समोरील व्यक्तीने भंगार मालाचा रेट 31 रूपये सांगत त्याचे जामदा येथील गोडावूनचे लोकशन पाठविले.
त्यानुसार, शर्मा हे दोन मित्रासंह त्यांच्या कारने जामदा येथे पोहोचले. त्यानंतर तीन दुचाकींवर आलेल्या इसमांनी तिघांना जंगलात नेले. तेथे दोरीने बांधून ठेवत बेल्ट, लाठ्या-काठ्या, हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच फिर्यादी शर्माकडील दीड लाखांची रोकड, ६० हजारांची दीड तोळ्यांची सोन्याची साखळी, २५ हजारांचा लॅपटॉप, तीन हजारांचा मोबाईल, कुलदिपच्या गुगलप्लेवरून अडीच हजार, तारीफकडील ३५ हजारांची रोकड, १३ हजार रोख, एटीएम घेऊन २ हजार असे एकूण ३ लाख ५३ हजार ६५५ रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
हेदेखील वाचा : सासरवाडीच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या; घरातच घेतला गळफास