(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mirzapur Film New Cast: पंकज त्रिपाठी, अली फजल, आणि दिव्येंदु शर्मा यांच्या दमदार अभिनयामुळे गाजलेली ‘मिर्झापूर’ (Mirzapur) वेब सिरीज आता मोठ्या पडद्यावर येत आहे. आता निर्मात्यांनी या मालिकेचे चित्रपटात रूपांतर केले आहे, ज्यामध्ये मुन्ना भैया पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. प्रेक्षकांना कालीन भैया आणि गुड्डू यांच्यातील लढाई देखील पाहायला मिळेल. ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटात वेब सिरीजमधील जुने कलाकार तर दिसणारच आहेत, पण त्याचबरोबर दोन नवीन आणि लोकप्रिय चेहरे देखील सामील होणार आहेत. हे दोन चेहरे दुसरे-तिसरे कोणी नसून जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) आणि रवी किशन (Ravi Kishan) हे आहेत.
‘मिर्झापूर’ चित्रपटावर सध्या वेगाने काम सुरू असून, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ‘जितू भैय्या’ म्हणून प्रसिद्ध असलेले जितेंद्र कुमार आणि प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांचा चित्रपटात समावेश झाला आहे. या दोघांच्याही भूमिकेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील अशी शक्यता आहे.
#Panchayat star #JitendraKumar and #RaviKishan join the cast of #Mirzapur the film#Mirzapur #mirzapur4 #AliFazal #PankajTripathi #Divyenndu https://t.co/lMv4mi5BQz
— Bollywood Life (@bollywood_life) August 16, 2025
मिळालेल्या रिपोर्टनुसार, या दोन्ही कलाकारांनी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला आहे. चित्रपटाच्या प्रोडक्शनशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या मुहूर्ताची पूजा झाली, त्यावेळी जितेंद्र कुमार आणि रवी किशन दोघेही उपस्थित होते.
या चित्रपटात दोन्ही कलाकारांना एक खास ‘सरप्राइज’ म्हणून ठेवण्यात आले आहे, जे चाहत्यांना नक्कीच आवडेल. त्यांचे ‘लुक टेस्ट’ आणि ‘रीडिंग सेशन’ पूर्ण झाले असून, आता ते ‘प्री-प्रॉडक्शन’च्या कामात व्यस्त आहेत. असे सांगितले जात आहे की, पुढील महिन्यापासून चित्रपटाच्या प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात होईल. मात्र, याबाबत जितेंद्र कुमार किंवा रवी किशन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘मिर्झापूर’ या ॲक्शन-क्राइम थ्रिलर वेब सिरीजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘अमेझॉन प्राइम’वर ही सिरीज पाहता येते. आता याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन चित्रपट तयार होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ असला तरी, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.