धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. एकीकडे देश स्वातंत्र दिन साजरा करत होता तर दुसरीकडे शिरपूर तालुक्यात ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.
आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
या प्रकणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली.
मागणी काय?
ही घटना १५ ऑगस्ट रोजीच घडल्याने या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामास्थांमध्ये संताप उसळला आहे. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे. आज सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे टीम दाखल झाले होते, यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सादर घटनाची पाहणी केली. या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले. सॅन्टोत जमावाने आरोपीच्या हॉटेलची तोडफोड केली आहे. संतप्त जमावाने आरोपीच्या हॉटेलची तोडफोड केली असून प्रकरणाचा पुढील तपास धिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.
बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल
कोल्हापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील किणी येथे घडली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसात करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात निषेद मोर्चा देखील काढण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकरण?
हातकणंगले तालुक्यातील किणी येथे अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित अल्पवयीन तरुण बसमधून येत असतांना त्रास देत असल्याचा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितले होते. आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आई घरात नसतांना आलेल्या तरुणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा अशी चर्चा परिसरात आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं आहे. पेठवडगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली तसेच न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.
पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी