(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली असून तेजस्विनी पंडितदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अथवा कोणता आजार होता याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात उद्या अर्थात रविवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण
गुरू (२०१६), ढोलकी (२०१५), तिचा उंबरठा, दमलेल्या बाबाची कहाणी, पाऊलवाट (२०११), मी सिंधूताई सपकाळ (२०१०), सलाम (२०१४), सांजपर्व (२०१४) यासारख्या अनेक चित्रपटांमधून ज्योती चांदेकर यांनी तगड्या भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान ‘ठरलं तर मग’ मधील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सर्व कलाकारांसाठी हा एक मोठा धक्का असल्याचे एका संकेतस्थळाला सांगितले आहे.
आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त
गेल्या ३ दिवसांपासून ज्योती चांदेकर यांची तब्बेत खऱाब झाल्याने त्यांना पुण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसंच त्या डायलिससवर असल्याचेही सुत्रांकडून कळले असून त्यांचे अवयव अखेर निकामी होत गेले आणि वेंटिलेटवर ठेवावे लागले असंही सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. तेजस्विनी पंडित आणि तिची बहीण या दोघीही तिच्या आईसह असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या दोन वर्षापासून सुरू असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली आणि अर्जुनची पूर्णा आजी म्हणून अत्यंत प्रेमळ तरीही खमकी अशी भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकरांचा एक खास चाहता वर्ग आहे आणि अगदी लहान मुलांमध्येही पूर्णा आजी म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. सध्या या मालिकेत ज्योती चांदेकरांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे मालिकेत आता मोठी पोकळी निर्माण होणार हे मात्र नक्की!






