लाच घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल (फोटो- istockphoto )
दौंड: गुन्ह्यातील जप्त असलेली गाडी न्यायालयातून सोडविण्यासाठी आवश्यक असलेला तपासी अधिकाऱ्यांचा लेखी जबाब न्यायालयात देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन ला.प्र.वि. वि. पुण्याचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.याप्रकरणी पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय पवार हे करीत आहेत.