तक्रारदाराला तक्रार मागे घेण्यासाठी शिक्रापूर येथे दमदाटी करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
शिक्रापूर : शिक्रापूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निमगाव दुडे ता. शिरुर येथील रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केली होती. असे असताना सदर तक्रार मागे घेण्यासाठी रवींद्र रणसिंग यांसह त्यांचा आत्या भाऊ राजू थोरात यांना मारहाण करत रवींद्र यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच मारहाण अन् दमदाटी करत रवींद्रच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निमगाव दुडे ता. शिरुर येथील रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केलेली सदर तक्रार मागे घेण्यासाठी नितीनचे काही नातेवाईक व मित्र वारंवार प्रयत्न करत आहेत, तर रवींद्र रणसिंग यांचे आतेभाऊ राजू थोरात हे टाकळी हाजी पेट्रोल पंप समोरून येत असताना नितीन गावडेचे मित्र बाबू वाळूंज सह त्याच्या साथीदारांनी राजू याला अडकून तू रवींद्र रणसिंगला नितीन गावडेची केस मागे घ्यायला सांग असे म्हणून मारहाण केली, त्यांनतर रात्रीच्या सुमारास बाबू वाळूंज सह आदी व्यक्तींनी रवींद्र रणसिंग यांच्या घरासमोर येऊन रवींद्र रणसिंग यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून रवींद्र यांना शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करत तू नितीनची केस मागे घेणार आहे का नाही असे म्हणून धमकी देऊन जात असताना बाबूच्या चुलत भावाने रवींद्र रणसिंग यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण हिसकावून ओढून नेले, याबाबत रवींद्र छगण रणसिंग वय ३२ वर्षे रा. निमगाव दुडे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यांसह बाबूचा चुलत भाऊ सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे यांसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत गरकळ हे करत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिरवळमध्ये एका फळविक्रेत्या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना आज सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिरवळ एस.टी. स्टॅंडजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तौफिक इब्राहिम बागवान (वय २९, रा. शिरवळ) असे जखमी युवकाचे नाव असून तो आपल्या स्टॉलवर फळविक्री करत असताना अज्ञात दोघा व्यक्तींनी अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तौफिक याला तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.