crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही हत्या बिजापूर जिल्ह्याच्या मारुडबाकातील लिंगापूरमध्ये ११ मेच्या मध्यरात्री घडली आहे. हत्या झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं नाव नागा भंडारी असं आहे.
भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या; दोन तरुण दुचाकीने आले अन्… ; घटना CCTV मध्ये कैद
नक्षलवाद्यांनी ही हत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही आहे. पोलीस खबऱ्या म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील बैनपल्ली गावचे उपसरपंच मुचाकी रामा यांची हत्या केली होती. त्यानंतर आता नक्षलवाद्यांनी काँग्रेस कार्यकर्ता नागा भंडारी यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
छत्तीसगड-गडचिरोली या पट्ट्यात सरकारकडून नक्षलवाद विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत नक्षलवाद्यांचे अड्डे शोधून नष्ट केले जात आहे. गेल्या काही महिन्यात सुरक्षा दलाने अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होत. काही आठवड्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी शांततेचा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती. मात्र आता या हत्येने नारीकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि भीतीच वातावरण आहे.
दोन लग्न होऊनही प्रेम प्रकरण, फिरायला गेले, जेवणही केले आणि मग…, आंध्रप्रदेशातील धक्कादायक घटना!