टॉक्सिक लव्ह! ऐन तारूण्यात जोडीदारांनीच तिघींचा केला घात, सोशल मीडिया ठरला कारण
प्रेम ही एक निस्वार्थी भावना आहे. एकमेकांविषयी आपुलकी, आयुष्यभर साथ देण्याचा, अधिकारांचं रक्षण करण्याचा विश्वास असतो. म्हणूनच तर हे नातं अधिक सुरक्षित मानलं जातं. पण याच नात्यात जोडिदारावर अधिकार गाजवला जातो आणि संशयाचं भूत शिरतं, तेव्हा हे विषाइतकं धोकादायक बनतं. एकमेकांचा जीवही घ्यायला मागेपुढे पाहिलं जात नाही. दिल्लीत अशाच एका घटनेत तीन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. कोमल (२१), विजयालक्ष्मी (१९) आणि मेहक जैन (१८) या तीन तरुणींची याच मानसिकतेमुळे अतिशय क्रुरपणे हत्या करण्यात आली.
Nagpur Crime: पुन्हा एक हुंडाबळी! अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून गळफास
१२ मार्च रोजी कोमलची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह छावला कालव्यात फेकून देण्यात आला, विजयालक्ष्मीला ७ एप्रिल रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंट भागात तिच्या २० वर्षीय प्रियकराने चाकूने भोसकून ठार मारले. महक जैनची हत्या २ जून रोजी दक्षिण दिल्लीतील महरौली येथे झाली. तिला चाकूने भोसकले गेले आणि नंतर पेटवून देण्यात आले. या प्रत्येक प्रकरणात, गुन्हेगाराच्या कृतींमध्ये मत्सर, अधिकार आणि त्यांच्या जोडीदारांना गमावण्याच्या तीव्र भीतीचे विषारी मिश्रण होतं, हे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम हा एक सामान्य घटक आहे, त्यावरील पोस्ट रागाला खतपाणी घालतात. यातूनच सूडाची भावना निर्माण होते, असं पोलिसांनी सांगितलं.
आरोपींनी त्यांच्या मैत्रिणींवर ‘नियंत्रण’ ठेवण्यासाठी आणि ‘नियंत्रण’ करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आणि मुलींना इतर मित्रांशी किंवा ओळखीच्या लोकांशी ऑनलाइन संवाद साधताना पाहून त्यांना सहन झालं नाही. या प्लॅटफॉर्मद्वारे मिळणारं तात्काळ समाधान आणि सततच्या संपर्कामुळे अशा थरारक प्रवृत्तींना चालना मिळाली, असंही पोलिसांनी सांगितलं.
वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निमीश देसाई यांच्यानुसार, या प्रकारात दिसून येणारी मानसिक अवस्था केवळ साधा जळफळाट नसून, “delusional disorder” च्या “jealous subtype” प्रकाराशी संबंधित आहे. “हे लोक बाहेरून सामान्य वाटतात. पण त्यांच्या मनात एक विशिष्ट भाग असतो, जिथे केवळ संशय, असुरक्षितता आणि मालकी हक्काची भावना काम करत असते. ते आपल्या पार्टनरवर पुरावे नसतानाही धोका दिल्याचा आरोप करतात,” आजकालच्या पिढीत नातेसंबंध जपण्याची क्षमता कमी झाली आहे. नकार पचवण्याची शक्तीही खूपच कमी झाली आहे. यामुळे असुरक्षितता वाढते आणि त्यातून अतिसंशयी, हिंसक वर्तन निर्माण होतं.
वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जितेंद्र नागपाल यांनी सांगितले की, “तणावग्रस्त नातेसंबंधात असलेल्या व्यक्तींना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा मिळणं गरजेचं आहे. अनेकांना त्यांच्या जवळच्यांकडूनही आधार मिळत नाही आणि त्यामुळे ते एकटे पडतात. अनेकदा लोकांना स्वतःच्या नात्यात काही गडबड आहे हे मान्य करणं लाजिरवाणं वाटतं. ‘माझं नातं परिपूर्ण नसेल तर?’ या विचाराने ते कोणाशी बोलतच नाहीत आणि अशा शांततेतच हिंसक वळण घेणारं वर्तन जन्म घेतं. नात्यातील लाल सिग्नल, सततचं भावनिक त्रासदायक वर्तन, असहिष्णुता आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. जर त्याकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर या सर्व गोष्टी लवकरच धोकादायक रूप धारण करू शकतात, असं त्यांनी सांगितलं.