प्रेयसीचा (GirlFriend) बदला घेण्यासाठी तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट (Create Fake Instagram Account) तयार करून प्रेयसी आणि तिच्या वडिलांचे छायाचित्र (Fathers Photo) वापरल्याप्रकरणी एका तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. फेक अकाउंटच्या माध्यमातून तो मैत्रिणीच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांना अश्लील मेसेज पाठवत असे (Used to send obscene messages to friend’s acquaintances and relatives). दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण नजफगढचा रहिवासी आहे (The accused youth is a resident of Najafgarh).
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीच्या सायबर पोलिसांना पीडितेने सांगितले की, अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवले आहे. तो माझ्या आणि माझ्या वडिलांच्या चित्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे. तो आमच्या ओळखीच्या लोकांनाही बनावट इन्स्टा अकाउंटवरून अश्लील मेसेज पाठवत आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
[read_also content=”तिला हवा तो गडी तिनं बरोब्बर हेरला , १३ वर्षाच्या मुलाला बनवलं वासनेची शिकार, राहिली गर्भवती तरीही तुरुंगात गेलीच नाही; जाणून घ्या नेमकं प्रकरण https://www.navarashtra.com/viral/shocking-horrible-crime-woman-made-13-year-old-boy-a-victim-of-her-lust-became-pregnant-but-will-not-go-to-jail-nrvb-374271.html”]
तपासादरम्यान विवेक (२१) या तरुणाच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बनावट खाते तयार करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर विवेक हा पीडित मुलीचा प्रियकर असल्याचे उघड झाले. दोघेही चार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. काही काळापूर्वी त्यांचे बोलणे बंद झाले होते. तेव्हापासून प्रियकर चिडला होता.
तो तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. पण मुलगी बोलत नव्हती. त्यानंतर बदला घेण्यासाठी त्याने मुलीची बदनामी करण्याचा कट रचला आणि बनावट इन्स्टा अकाउंट बनवून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
[read_also content=”उमेश पाल हत्याकांड : Allahabad University चं मुस्लिम हॉस्टेल सील, इथंच तयार झाली होती हत्येची ‘ब्लूप्रिंट’ https://www.navarashtra.com/crime/prayagraj-crime-news-umesh-pal-murder-case-update-allahabad-university-muslim-hostel-sealed-atik-ahmed-gang-blue-print-ready-here-nrvb-374281.html”]
द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, आरोपी विवेक हा दक्षिण पश्चिम दिल्लीतील नजफगढ भागातील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. यासोबतच त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.