धुळे: धुळे शहरातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेकडून तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये देखील उकळले. याप्रकरणी पीडितेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बोरसे याने पीडित महिलेला सुरुवातीला आर्थिक मदत केली होती. यातून त्यांची ओळख वाढत गेली. १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास, बोरसे याने महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिला शुद्धीवर नसतांना तिच्यावर अत्याचाहर केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमकीच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले आणि पीडितेचे सही असलेले पाच ते सहा धनादेशदेखील स्वतःकडे ठेवून घेतले. एवढेच नाही तर वेळोवेळी अत्याचारही केला.
आरोपीला अटक
हा सर्व प्रकार दोन वर्षात घडला. अखेरीस, पीडित महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याच रात्री त्याला अटक केली आहे. पोलीस या पार्कनाचा तपास करत असून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच…
Ans: मुख्याध्यापक
Ans: 60 लाख
Ans: होय






