hanamari (फोटो सौजन्य- pinterest)
लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरु झालेल्या किरकोळ वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार परभणीत घडला आहे. यात दोन्ही गटाकडून झालेल्या मारामारीनंतर दगडफेकही झाली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा राडा परभणीच्या लहुजी नगर आणि एकबालनगरमध्ये काल (१९ एप्रिल ) झाला आहे.
फक्त १० रुपयातून वाद विकोपला आणि भाईंदर महापालिकेतील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने केले चाकूने वार
परभणीच्या लहुजी नगर आणि एकबालनगरमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून किरकोळ वाद सुरु झाला होता. त्या किरकोळ वादाचा रूपांतर जोरदार राड्यात झाला. यात दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचली असून पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, तेहसीलदार विकास राजगुरू यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या ताफ्याकडून शनिवारी (१९ एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत परिसरात तणावपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिला आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
नाशिक मध्ये पोलिसांवर दगडफेक; सातपीर दर्गा प्रकरण
नाशिक शहरातील सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ३९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी (१९ एप्रिल) ३७ जणांना कोर्टात हजार करण्यात आले होते. यापूर्वीचे ३७ आणि काल हजर केलेले दोन ३९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक शहरातील काठी गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या विरोधात जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत 21 हुन अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले होते. अशातच या दंगेखोरांना न्यायालयाने ही दणका दिला आहे.