नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील (Liquor Policy) कथित भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने (ED) दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापे मारले. देशातील ३० ठिकाणी छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर भाजपकडून टीका सुरू होती. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह लखनऊ, गुरुग्राम, चंदिगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे.
Delhi Excise Policy case | Enforcement Directorate (ED) raids underway in Delhi and multiple cities in Uttar Pradesh, Punjab Haryana, Telangana & Maharashtra.
Visuals from the residence of businessman Sameer Mahandru in Jor Bagh, Delhi. pic.twitter.com/Ysr6gBKvsA
— ANI (@ANI) September 6, 2022
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात ३० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सध्या छापे टाकलेले नाहीत. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील लखनौ, हरियाणातील गुरुग्राम, चंदीगढ (Chandigarh), मुंबई (Mumbai), हैदराबाद (Hyderabad), बंगळुरूमध्ये (Bangalore) अजूनही छापेमारी सुरू आहे.
Delhi Excise Policy case | Enforcement Directorate (ED) raids underway in Delhi and multiple cities in Uttar Pradesh, Punjab Haryana, Telangana & Maharashtra.
Visuals from the premises of Amit Arora, director of Buddy Retail Pvt Limited, in Gurugram, Haryana. pic.twitter.com/7njbaVtgmE
— ANI (@ANI) September 6, 2022
ईडीचे पथके दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचली आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीने छापा टाकला असून समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे एमडी आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. ईडीकडून सीबीआय एफआयआरमध्ये ज्यांची नावे नोंदवली गेली आहेत अशा खासगी व्यक्तींवर आज कारवाई केली जात आहे.