वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बुलडाणा : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असे असताना आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाण्यातील खामगावमध्ये माजी सरपंचावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
निलेश देशमुख असे माजी सरपंचाचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून माजी सरपंच देशमुख आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नंतर आरोपीने थेट लोखंडी रॉडने निलेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मयूर सिद्धपुरा असे आरोपीचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेले माजी सरपंच निलेश देशमुख यांच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोक्याला गंभीर दुखापत
या हल्ल्यात सरपंचांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका आहे, या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुलढाण्यातील खामगावात एक धक्कादाक घटना घडली आहे. खामगावातील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
पुण्यातील वारजेत तरूणावर हल्ला
दुसरीकडेे, वारजे परिसरात जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने कोयते तसेच कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत देखील माजवली. दोन दिवसांपुर्वी रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भैय्या उर्फ लक्ष्मण शेडगे याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत जुबेर शेख (वय २२) याने तक्रार दिली आहे. हल्यात अक्षय कांबळे (वय २८) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.