अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्यास गंडा (File Photo : Fraud)
भंडारा : बनावट कंपनीच्या माध्यमातून 7 जणांची 1 कोटी 16 लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींवर लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश मधुकर चुटे (35, रा. सडक अर्जुनी), रत्नेश गुरूप्रसाद तिवारी (45, रा. वडसा जि. गडचिरोली), किशोर चरणदास गोंडाणे (45, रा. परसटोला ता. अर्जुनी मोरगाव), मंगेश डाकराम वाणी (42, रा. पाहूणगाव ता. लांजेवार), रवींद्र प्रल्हाद बोरकर (51, रा. इटान ता. लाखांदूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाचा 8 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; मुलीचे आई-वडिल कामाला गेल्यानंतर ‘तो’ आला अन्…
आरोपींनी संगनमत करून जीटी कोअर एसटी कन्सल्टन्सी या बनावट कंपनीची स्थापना केली. फिर्यादी 7 जणांना लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर भरमसाठ व्याजासह दरमहा हजारो रुपये देण्याचे आमिष दाखवले. या लालसेपोटी या फिर्यादी 7 पीडितांसह अनेकांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली. गुंतवणुकदारांना काही महिने नियमितपणे काही रक्कमही देण्यात आली.
गेल्या फेब्रुवारी 2023 ते जून 2024 या कालावधीत दरमहा मिळणारी रक्कम थांबली. त्यांनी आरोपींना घटनेत गुंतवलेली रक्कम देण्याची मागणी केली. मात्र, गेल्या एक वर्षापासून गुंतवणुकीची रक्कम देण्यात येत नव्हती. त्यांचे मोबाईलही लागत नव्हते. जीटी कोअर एसटी कन्सल्टन्सी ही कंपनी बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुंतवणुकीदारांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चार आरोपींना अटक
बनावट कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून गुंतवणूकदारांची 1.16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी एकूण 5 पैकी 4 आरोपींना अटक केली आहे. तर 1 आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाकडून पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची ४३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवडमधील उच्चशिक्षित तरुणाची 80 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेदेखील वाचा : Badlapur crime : ‘शेजारचा दादा आला आणि कडेवर घेऊन अंधाऱ्या ठिकाणी…,’ ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बदलापूर पुन्हा हादरलं