अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्यास गंडा (File Photo : Fraud)
कराड : ओगलेवाडी (ता. कराड) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर पोलीस असल्याचे भासवून तोतयाने गंडा घातला. याने सोनसाखळी आणि चार ग्रॅम वजनाची अंगठी असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना शनिवारी (दि.28) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हेदेखील वाचा : नात्याला कलंक ! चुलत भावाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोटात दुखतंय म्हणून मुलगी डॉक्टरकडे अन्…
याबाबत सयाजी गोविंद डांगे (वय 60, रा. विरवडे, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विरवडे येथील सयाजी डांगे हे शनिवारी सायंकाळी ओगलेवाडी येथे आले होते. ओगलेवाडी येथील बस थांब्यानजीक एका गाड्यावर वडापाव खाल्ल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते पायी चालत निघाले होते. तेव्हा जिल्हा बँकेसमोर ३५ ते ४० वर्षे वयाच्या व्यक्तीने त्यांना अडवले. त्याच्या डोक्यात हेल्मेट व तोंडावर मास्क होता. त्याने त्याचे ओळखपत्र दाखवून मी पोलीस आहे, असे म्हणत सयाजी डांगे यांचे नाव आणि पत्ता लिहून घेतला.
तसेच ओगलेवाडीत गांजाची तस्करी चालू आहे. मी तपासणी करत आहे. तुम्ही गळ्यात सोनसाखळी व हातात अंगठी घालून फिरू नका. सोनसाखळी आणि अंगठी माझ्याकडे द्या. तुम्हाला ते रुमालात बांधून देतो, असे संबंधिताने सांगितले.
सयाजी डांगे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील सोनसाखळी आणि बोटातील अंगठी काढून त्याच्याकडे दिली. त्यानंतर संबंधिताने रुमालात बांधून देण्याचा बहाणा करत हातचलाखीने सोनसाखळी आणि अंगठी लंपास केली. रुमालात डायरी घालून तो रुमाल त्याने सयाजी डांगे यांच्या खिशामध्ये कोंबला. त्यानंतर तो चोरटा तेथून निघून गेला.
रुमाल उघडून पाहिला अन् नंतर…
संशय आल्यामुळे सयाजी डांगे यांनी रुमाल उघडून पाहिले असता त्यामध्ये अंगठी आणि चैन नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी याबाबतची फिर्याद सोमवारी सायंकाळी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
हेदेखील वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…