काय नेमकं प्रकरण?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव घनश्यामसिंह वाघेला (वय ४२) असे आहे. धर्मेंद्रसिंह वाघेला असे हत्या करणाऱ्या चुलत भाऊचा नाव आहे. याप्रकरणी भक्तिनगर पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या मोठ्या भावाच्या पत्नीशी घनश्यामसिंह यांचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरूनही दोन्ही कुटुंबांत मोठा तणाव होता. या वादातूनच आरोपीच्या भावाने आधीही घनश्यामसिंह यांच्यावर हल्ला केला होता आणि नंतर पत्नीला घटस्फोट दिला होता.
आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर
आरोपीने धर्मेंद्रसिंह याने गांधीग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये घनश्यामसिंह सतत फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप केला होता. या भीतीपोटी आरोपीने आपले घरही बदलले होते. तसेच, हत्येच्या एक दिवस आधी घनश्यामसिंह यांनी धर्मेंद्रसिंह याला तब्बल 40 ते 50 मिस्ड कॉल्स केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आपल्या एका सहकाऱ्यासह ॲक्टिव्हावरून घनश्यामसिंह यांचा शोध घेत होता आणि अखेर त्यांनी गाठून ही प्राणघातक घटना घडवली.
हत्येमागचं कारण काय?
आरोपी हत्येनंतर फरार झाला होता. तो आधी अहमदाबाद आणि नंतर लिंबडीच्या दिशेने पळून गेला. भक्तीनगर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच त्याला लिंबडी महामार्गावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता घनश्यामसिंह आपली हत्या करेल या भीतीनेच त्याने हा कट रचला असल्याचे समोर आले. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.
शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
Ans: घनश्यामसिंह वाघेला.
Ans: धर्मेंद्रसिंह वाघेला.
Ans: कौटुंबिक वाद आणि कथित अनैतिक संबंधांचा संशय.






